• "राधेय भवन" मेन रोड, बाजार चौक,
  • पारशिवनी, जि. नागपूर महाराष्ट्र ४४११०५
  • 98226 73484
  • policepatilsanghtna@gmail.com

पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य

अध्यक्षांचे मनोगत

  • Shri. Deepak Paliwal

नमस्कार मित्रांनो,
आपणा सोबत संवाद साधण्याचा मी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करीत होतो. पण तसा योग येत नव्हता. आज तो योग जुळून आला आहे. १९९५ ला विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघ या संघटनेची स्थापना राज्यातील पोलीस पाटीलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या प्रलंबित मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याच्या व पोलीस पाटीलांच कल्याण व्हाव या दृष्टीने करण्यात आली. व यास धर्मदाय उपआयुक्त नागपूर विभाग नागपूर यांचे कडून दि. १८/०९/१९९७ रोजी अधिकृतरित्या नोंदणीकृत करण्यांत आली. व संघटनेचे काम करतांना अनेक अडीअडचणी आल्यात त्या बाजुला साररून पोलीस पाटीलांसाठी सतत काम सुरू होते. विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघटनेच्या माध्यमाने २५ वर्ष पोलीस पाटीलांची सेवा करण्याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे.

पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकदा नागपूर व मुंबई येथे मोर्चे काढलीत, आंदोलने केली, धरणे दिले. उपोषणाच्या माध्यमाने लढा देवून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचा संघटनेला अभिमान आहे. मित्र हो, माझ्यावर अनेकदा टीका करण्यात आल्या की, दिपक पालीवाल हा पोलीस पाटील नाही. त्याला पोलीस पाटीलांच्या अडीअडचणीची कल्पना नाही. मग हा माणूस पोलीस पाटलांचे प्रश्न कसे सोडविणार? सतत २५ वर्ष या माध्यमाने राज्यातील पोलीस पाटलांची सेवा करण्याची संधी मला विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघटनेच्या माध्यमातून मिळाली. आपण सर्वांनी मला आपली सेवा करण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.

मित्रांनो, आता आपण विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघ ऐवजी पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या नावाने कामगार आयुक्ताकडे श्रमिक संघ अधिनियम १९६७ अन्वये आपली संघटना दि. १ मे २०२० रोजी नोंदणीकृत करून घेतली आहे. राज्यातील ही पहिलीच संघटना आहे, ज्यांचे राष्ट्रीयकृत बँकते संयुक्त खाते उघडण्यात आले असून देशमुख शेंडे ऍण्ड कंपनी, नागपूर यांना संघटनेने लेखापरीक्षनासाठी नियुक्त केले असून संघटनेने दि. ०१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० व १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत केलेल्या जमाखर्चाचे ऑडिट करून कामगार आयुक्त, नागपूर यांच्याकडे जमा करण्यात आले आहे. व त्याप्रमाणे सोशिअल मीडियावर देखील ऑडीट रिपोर्ट सर्व पोलीस पाटीलांना सार्वजनिकरित्या अवलोकन करता यावे, यासाठी राज्यातील पोलीस पाटीलांच्या जवळपास सर्वच गृपवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संघटनेने एक उच्चस्तरीय सल्लागार समिती तयार केली असून त्या समितीत सेवा निवृत्त ३ पोलीस पाटील २ जेष्ठ पत्रकार ५ विधी तज्ञ व्यक्ती असे एकूण १० लोक घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पोलीस पाटीलांची हि एकमेव संघटना आहे . ज्यांची वेबसाईड तयार करण्यात आली असून त्याचे लोकार्पण राज्याचे माजी राज्यमंत्री मा. श्री. राजेंद्रजी मुळक यांच्या शुभहस्ते व रामधाम चे संस्थापक , पर्यटन मित्र मा. श्री. चंद्रपालजी चौकसे , श्री. श्रीधरजी झाडे , सौ. अर्चनाताई भोयर जि. प. सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले. आपल्या संघटनेचे सदस्यता प्रवेश फार्म देखील ऑनलाईन आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, आपल्या पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची इथंभूत माहिती या वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आपलाच,

(दिपक पालीवाल)
अध्यक्ष
पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य