• "राधेय भवन" मेन रोड, बाजार चौक,
  • पारशिवनी, जि. नागपूर महाराष्ट्र ४४११०५
  • 98226 73484
  • policepatilsanghtna@gmail.com

पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य मध्ये

आपले स्वागत आहे

पोलीस पाटील हे पद प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे. त्या काळी हे पद गावातील शूर व कर्तृत्वान व्यक्तीकडे दिल्या जाई . शिवाजी महाराजांच्या काळापासून तसेच मोगलांच्या काळापासून पोलीस पाटील हे पद आस्तित्वात आले. पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य हि संघटना गेले २५ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस पाटील यांच्यासाठी कार्यरत आहे. संस्थेचे पूर्वीचे नाव विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघ असे होते ते बदलवून "पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य" या नावाने कामगार आयुक्ताकडे श्रमिक संघ अधिनियम १९६७ अन्वये दि. १ मे २०२० रोजी नोंदणीकृत करून घेतले आहे.

पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य

अध्यक्षांचे मनोगत

नमस्कार मित्रांनो,
आपणा सोबत संवाद साधण्याचा मी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करीत होतो पण तसा योग येत नव्हता. आज तो योग जुळून आला आहे. १९९५ ला विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघ या संघटनेची स्थापना राज्यातील पोलीस पाटीलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या प्रलंबित मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याच्या व पोलीस पाटीलांच कल्याण व्हाव या दृष्टीने करण्यात आली. व यास धर्मदाय उपआयुक्त विभाग नागपूर यांचे कडून दि. १८/०९/१९९७ रोजी अधिकृतरित्या नोंदणीकृत करण्यांत आले. संघटनेचे काम करतांना अनेक अडीअडचणी आल्यात, त्या बाजुला सारून पोलीस पाटीलांसाठी सतत काम सुरू होते. विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघटनेच्या माध्यमाने २५ वर्ष पोलीस पाटीलांची सेवा करण्याचा मला सार्थ अभिमान आहे.
संपूर्ण वाचा

सभासद फॉर्म